पाचोरा प्रतिनिधी :: तालुक्यातील निमखेडी (ता.सोयगाव) व शिंदाड शिवारालगत नाल्याकाठी असलेल्या दोन दारूच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. असे सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी सांगितले. या कारवाईचे परिसरातील जनतेने जोरदार स्वागत केले आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच अवैध धंद्या विरोधात जोरदार मोहीम आखल्यामुळे परिसरातील जनता पोलीस स्टेशनवर खुश असल्याचे बोलले जात आहे. या धाडसी कारवाईमुळे ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे बोकाळले आहेत. त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी श्रीमती कायटे यांना गुप्त माहिती देण्यास सुरुवात केले आहे. त्यामुळेच कारवाई शक्य होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
गुरूवारी सकाळी त्यांना गुप्त माहिती मिळाल्याच्या खबरीवरून सपोनि नीता कायटे यांच्यासोबत पोलिस रणजीत पाटील, अरुण राजपूत, ज्ञानेश्वर बोडके, योगिता चौधरी, चालक सचिन वाघ आदींच्या पथकाने गोपनीयता पाळून शिंदाड येथील पिरखा बाबुलाल तडवी हा निमखेडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यात गावठी हातभट्टी चालवत असताना धाड टाकली. मात्र पिरखा तडवी झाडाझुडपातून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याची हातभट्टी नेस्तनाबूत करण्यात आली.
लगेच दुसरी कारवाई अनिल मासूम तडवी याच्याही हातभट्टीवर टाकताच तोही पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी दोन्ही भट्टीवरील कच्चे रसायन ३०४००/ तर तयार दारु १०००/ ची जप्त करण्यात आले असून, कलम ६५ अन्वये दोन्ही आरोपीवर गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आमच्या हद्दीतील एकही अवैध धंदा सुरू राहणार नाही. अशी ग्वाही सपोनि व त्यांच्या पथकाने दिली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.