पाचोऱ्यात मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पाचोरा

पाचोरा प्रतिनिधी >> जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून त्‍यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानूसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी चेह-यावर मास्क लावणे सक्तीचे करण्यात आलेले असुन मास्क न वापरतांना कुणीही आढळून आल्यास संबंधीताकडून ५०० रुपये दंड म्हणुन वसुल करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली असुन २४ जुन रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अचानक तपासणी केली असता शहरातील विविध भागातील मास्‍क न वापरणा-या ३४ नागरिकांवर कारवाई करत २ हजार ५०० रुपये दंड वसुल आकारण्‍यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *