पाचोऱ्याचे माजी आमदार कार अपघातात थोडक्यात बचावले

क्राईम पाचोरा

रिड जळगाव टीम ::> पाचोऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे मुंबई येथून परत येताना झालेल्या अपघातात थोडक्यात बचावले. वडाळा जवळ पुढील चारचाकी वाहन अचानक बंद पटल्याने मागून येणाऱ्या पाच ते सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात वाघ यांच्याही वाहनाचा समावेश होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ २३ सप्टेंबरला मुंबई येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी मंत्रालयातील कामे आटोपून घरी पाचोऱ्याकडे परत येत असताना मुंबई जवळील वडाळाजवळ दुपारी १ वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहन अचानक बंद पडले.

त्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या ५ गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या. त्यात दिलीप वाघ यांची एमएच.१९-बीएक्स. २००७ क्रेटा ही गाडी सहाव्या क्रमांकावर होती. ही गाडी पाचव्या क्रमांकावर असलेल्या वाहनास धडकली. त्यात दिलीप वाघ हे डाव्या बाजूला बसले होते. नेमके याच बाजूने गाडीचा चेंदामेंदा झाला. मात्र, सुदैवाने वाघ यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांच्यासोबत शशिकांत चंदिले, स्वीय सहायक गोपी पाटील हे होते. सर्व जण सुखरुप आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *