अनुसूचित जमाती मध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये

आंदोलन कट्टा पाचोरा

रिड जळगाव टीम ::> महाराष्ट्र शासनाने ही सर्व परिस्थीती लक्षात घेवून सरकारला आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट करू नये, अशा आशयाचे निवेदन एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे व जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, यांच्या आदेशानुसार तहसिलदार, पोलिस स्टेशन यांना देत आंदोलन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून धनगर तसेच इतर काही जातींतील अनुसूचित जमातींना असलेले ७ टक्के आरक्षणात समावेश व्हावा म्हणून घटनाबाह्य पध्दतीने मागणी करत असल्याचे दिसत असतांना यामध्ये धनगर समाज आघाडीवर आहे. अनेक अभ्यासगटांनी त्यांची मागणी चुकीची असल्याचे ही सांगितले आहे. आदिवासी समाज बांधव जे अनुसुचित जमाती मध्ये येतात त्यांच्या परंपरा, भाषा, स्वभाव, वैशिष्ट्ये व धनगर समुदायाच्या परंपरा यातही फरक आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *