विवाहितेची आत्महत्येप्रकरणी पतीसह सात आरोपींना कोठडी

आत्महत्या क्राईम निषेध पाचोरा

रिड पाचोरा प्रतिनिधी ::> सांगवी (होळ) येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माझ्या बहिणीची आत्महत्या नसून तिच्या सासरच्या मंडळीने तिला आगोदर घरात मारुन नंतर ग्रामपंचायतीच्या विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप करुन आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी तक्रारदार तथा मृत विवाहिचेचा भाऊ सोनवणे यांनी केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात पती आबा पाटील, सासू निर्मला पाटील, दीर ज्ञानेश्वर पाटील, दिराणी शीतल पाटील, नणंद रंजना पाटील (रा. सर्व सांगवी), नंदोई रमेश पाटील व नणंद रत्नाबाई पाटील (नगरदेवळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.