चोपडा तालुक्यात भरड धान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी

चोपडा रिड जळगाव टीम शेती सिटी न्यूज

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> सन २०२०-२१ या खरीप हंगामात शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरड धन्य केंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शेतकी संघामार्फत ज्वारी, मका खरेदीसाठी ४ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू होईल.

या केंद्रात ज्वारी २६२०, मका १८५० आणि बाजरीला २१५० प्रती क्विंटल हमीभाव देण्यात येईल. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावनोंदणीसाठी चालू खरीप हंगामातील पीक पेरा असलेला सातबारा उतारा, आधार व बँक पासबुकची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन शेतकी संघाचे चेअरमन एल.एन.पाटील, व्यवस्थापक राहुल पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, भरडधान्य विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पैसे जमा होतील. मात्र, त्यासाठी जनधन, शिष्यवृत्तीचा खाते क्रमांक देऊ नये.