ऑनलाईन शिक्षणाच्या आईचा घो

ऑनलाईन-बिनलाइन ब्लॉगर्स कट्टा

कोरोना या रोगामुळे महाराष्ट्रातील नवे तर संपूर्ण देशातील शाळा, कॉलेज, महाविद्यालय हे बंद ठेवण्यात आले आहे.

जवळपास आता तीन माहिने पुर्ण होतील तरी देखील सरकारला शिक्षण व्यवस्थे संदर्भात योग्य असा निर्णय घेता न आल्याने अखेर ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

परंतू या निर्णयाचा सर्वाअधिक फटका शेतकरी, हातमजूरी करणाऱ्या गोर- गरीब जनतेला बसतांना दिसतोय.

ऑनलाईन शिक्षणाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज बिड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील राजेंद्र भानुदास संत या अल्पभूधारक ऊस तोड कामगाराच्या मुलाने अभिजीत संत याने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली आहे.

अभिजीत हा हूशार होता व दहावीच्या परिक्षेत तो चांगल्या गुणांनी उतीर्ण झालेला होता. पुढील शिक्षण एम.कॉम मध्ये पुर्ण करून बँकेत नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न होते.

परंतू ऑनलाईन शिक्षणाच्या निर्णयामुळे त्याचे स्वप्न भंगले पुढील काही दिवसात ऑनलाईन शिक्षण सुरू होणार म्हणुन त्याने वडिलांकडे स्मार्ट फोन ची मागणी केली होती.

परंतू घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची व बिकट असल्याने इतका महागडा मोबाईल घेणे वडिलांना शक्य झाले नाही.

पुढील शिक्षण कसे होणार या चिंतेने त्याने गळफास घेत राहत्या घरात आत्महत्या केली.


ऑनलाईन शिक्षणाच्या निर्णयामुळे आज महाराष्ट्रांने एक हूशार व होतकरून विद्यार्थी गमवला आहे.

महाराष्ट्रात दररोज अशा एक ना अनेक घटना घडतात व गोर-गरीब जनतेचे मुलच या घटनांना बळी पडतात.

साहेब तुम्ही पुर्ण पणे शिक्षणाचा आईचा घो करून ठेवल्याने अशा घटना घडत आहे. कृपया हा ऑनलाईन शिक्षणाचा प्रकार थांबवावा होणऱ्या घटना आळा घालावा.

गोपाल मराठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *