निवडणुकीमुळे बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने पुढे ढकलल्या परीक्षा

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक

जळगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या १५ जानेवारीला होणाऱ्या ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मधील कला, विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभासक्रमांतर्गत २, ४ व ६ या सत्रातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन एमसीक्यू स्वरूपात ५ जानेवारीपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

परीक्षार्थी विद्यार्थी व संबंधित घटक मतदानापासून वंचित राहू नये म्हणून १५ रोजी विद्यापीठामार्फत आयोजित सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या दिवसाच्या अभ्यासक्रमनिहाय परीक्षांच्या तारखा लवकरच कळवण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी कळवले आहे.