निंभोरा पोलिसांकडून काटेरी झुडपांची साफसफाई

NIMBHORA Social कट्टा कट्टा पाेलिस रावेर

पोलिसदादाच वळणावरील झुडपे काढताना पाहून प्रवाश्यांना आश्चर्याचा धक्का बसला

निंभोरा प्रतिनिधी >>पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढतात. याचा त्रास सर्वांनाच होतो. असे असले तरी केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून गळे काढले जातात. या पार्श्वभूमीवर स्वतः हातात विळे घेत ही झुडपे काढण्यासाठी सरसावलेले पोलिस पाहून वाहन धारकांना सुखद धक्का बसला.

निंभोरा पोलिस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी हद्दीतील २९ गावांमध्ये माहितीस्तव फेरफटका मारला. रस्त्यांच्या काही वळणांवर होत असलेल्या अपघातांबद्दल माहिती जमा केली. त्यात बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर विवरे गावाजवळील वळणाजवळ वारंवार अपघात होत असल्याचे नोंदींवरून कळाले. त्या उनवणे हे सहकारी सहकारी सहायक फौजदार रामदास पाटील, विकास कोल्हे, विवरे गावातील पोलिस पाटील, पंकज बेंडाळे यांच्यासह अपघात होणाऱ्या वळणावर पोहोचले.

ग्रामस्थांच्या मदतीने स्वतः पोलिसांनी वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली काटेरी झुडपे काढण्यास सुरुवात केली. संबंधित ग्रामपंचायतींना देखील सहकार्य करण्याची सूचना केली. स्वतः पोलिसदादाच वळणावरील झुडपे काढताना पाहून आश्चर्याचा धक्का बसला.