शिक्षकांच्या वेतनासाठी लढणाऱ्या शिक्षक आ. देशपांडेना कोरोनाची लक्षणे, आतातरी शिक्षणमंत्र्यांना जाग येईल का?

नवापूर महाराष्ट्र माझं खान्देश


नवापूर प्रकाश खैरनार >> गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या कायम विनाअनुदानित शिक्षकांना व उच्च माध्यमिक विभागाच्या वाढिव / प्रस्तावित पदांवरील शिक्षकांना वेतनासहित मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. श्रीकांत देशपांडे यांच्या कोरोना संसर्ग पोझीटिव निघाल्याने, शिक्षण मंत्र्यांनी आता तरी जागे व्हावे व्हावे. शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी शिश्रकांकडून होत आहे.

मुंबईमध्ये कोरोनानं थैमान मांडलं असताना मागील दिड महिन्यापासून आपला वाढीव पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सरांच्या प्रयत्नात नेहमी सहभागी असणारे व योगदान देणारे आ. श्रीकांत देशपाडे , आ. बाळाराम पाटील यांनी जीवाची पर्वा न करता विनाअनुदानीत, घोषीत, अघोषीत व आपल्या वाढीव पदांच्या प्रश्ना साठी दर आठवडयाला मुबंई ला जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी व पंधरा विस वर्षापासून विनावेतन शिक्षकांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटावा, या साठी अंगावर संकटे झेलून प्रश्न मिटवण्यासाठी धडपडणारे आमदार महोदयांच्या कार्याला सलाम. मुबंई दौऱ्याच्या वारंवार प्रयत्नामुळे आ. देशपांडे यांना एक महिन्यापूर्वी कॉरंटाईन ठेवले गेलं होत. आत्ता तर सरांचा कोविड चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे कळाले. खूप वाईट वाटलं. मानवसेवेचा उदात्त हेतू समोर ठेऊन निस्वार्थीपणाने लढणाऱ्या आमच्या मार्गदर्शकास ईश्वरानी लवकरात लवकर बरे करुन मानव कल्याणासाठी पुन्हा पुन्हा लढण्याची आयु आरोग्य व आशिर्वाद दयावं. अशी प्रार्थना परमेश्वराला केली जात आहे.


शिक्षणमंत्री जागे होतील का?
आतातरी शिक्षणमंत्र्यांनी जागे होऊन या शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावायला हवा कारण जो पर्यंत यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत या आमदारांना चैन पडणार नाही व मुंबईत दिवसेंदिवस वातावरण बिघडत असून आता या शिक्षकांचा अंत पाहू नये व वेतन सुरू करावे अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *