‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देण्याबाबत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे निवेदन

चाळीसगाव

चाळीसगाव (राज देवरे): माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ड्युटी दिली जात आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यासाठी केली जात आहे म्हणून आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने चाळीसगांव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदन दिले.

covid-19 यांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्या कालावधीत राष्ट्रीय आपत्ती निवारण यासाठी राज्यातील शिक्षकांना इतर कर्मचार्‍यांच्या बरोबरीने आवश्यक ती सर्व सेवा शासन आदेशाप्रमाणे वेळोवेळी पार पाडल्यावर या जोखमीच्या ड्युटी बजावत असताना आदेशाप्रमाणे आणि राष्ट्रीय आपत्ती राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने ड्युटी बजावली आहे 15 जून 2020 पासून शाळा महाविद्यालयांचे नियमित शिक्षण वर्ष सुरू झाल्याने शासन शिक्षकांना त्यांच्या शिक्षण नियमित काम करता यावे यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्याबाबत उपरोक्त शासन आदेश घोषित केलेली आहे शिक्षकांनी आपले काम नियमितपणे व सातत्य पणे पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी covid-19 च्या संबंधित कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना covid-19 च्या संबंधित काम कर्जातून मुक्त करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश शासनाने उपरोक्त दिनांक 17/ 3/ 2020 च्या आदेशाने दिलेले आहेत असे असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून उपरोक्त शासन आदेश डावलून शिक्षकांना माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ड्युटी दिली जात आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्याची सक्ती केली जात आहे असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी हेमंत देवरे, मिलिंद भालेराव, प्रशांत लवंगे, किशोर वाणी, अजिज खाटीक, अफसर खाटीक, सुशिल सोणवने, दिनेश जगताप, दिनकर पाटील, चंद्रकांत ठाकरे, विवेक पाटील, निखील महाले, शरद सूर्यवंशी, मनोज शिनकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *