जिल्ह्यात नवमतदारांनी नोंदणी करावी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

Jalgaon Jalgaon MIDC जळगाव

जळगाव >> निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत नमुना अर्ज भरुन मतदार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास, किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मृत मतदारांचे नाव वगळणेसाठी नमुना ७ अर्ज भरता येईल, नमुना ८ अर्ज भरुन आपल्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल. नमुना ८ अ अर्ज भरुन विधानसभा मतदार संघाअंतर्गत आपला पत्ता बदलता येईल. नागरीकांना www.nvsp.in या संकेतस्थळावरुन देखील विहित नमुन्यात ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील.