‘नेत्रचेतना, रक्तदानाचा’ जागर करीत युवकांचा अनोखा संकल्प; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापन दिन साजरा

चाळीसगाव

चाळीसगाव >>राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील शिवकृपा मोटर्स येथे चाळीसगाव शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘नेत्रचेतना जागर, व रक्तदान संकल्प’ राबविण्यात आला. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत अर्ज भरुन घेतलेत तर रक्तदानाचा संकल्प करीत जास्तीत जास्त बाटल्या संकलित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोरोना काळात मृत पावलेल्या नागरीकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली तर कोरोना योद्धांनी बजावलेल्या कार्याबाबत पदाधिकाऱ्यांच्या वतीने ठराव मांडण्यात आला. यावेळी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक तथा जेष्ठ नेते शिवाजी आमले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नेत्रदानासाठी वयोमर्यादा नसून कोणीही नेत्रदान करु शकते. मृत्यूनंतर चार तासांत नेत्रदान करणे आवश्यक आहे. चार दिवसांपर्यंत नेत्ररोपण करता येते. नेत्रदान करणाऱ्यांना मरणोत्तरही जग पाहता येते, नेत्रदान केल्याने अनेकांना दृष्टी मिळू शकते असे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सांगितले तर निसर्गाने घडविलेल्या अनेक वस्तूंचे सौंदर्य, आकार, रंग, व्यक्तींचे भाव पाहण्याचे सामर्थ्य डोळ्यांत आहे. मृत्यूनंतर डोळे मातीमोल होऊ देण्यापेक्षा नेत्रदान करून अनेकांना जग पाहण्याची संधी उपलब्ध होऊ शकते तर रक्तदानाच्या माध्यमातून प्रत्येकाने सामाजिक संवेदनशीलता जोपासावी असे मत जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.

नेत्रदानासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात, त्याला काही खासगी प्रचार संस्थांची जोड मिळते, प्रचाराची अजूनही गरज आहे. नेत्रपेढीला दरवर्षी सरासरी शंभर नेत्रजोड मिळतात. मात्र हा आकडा शंभरीच्या पुढे गेलेला नाही. यासोबतच कोरोना सदृश काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता युवकांच्या वतीने रक्तदानाचा संकल्प करण्यात आला. रक्तदान व नेत्रदानासाठी प्रचार आणि अंमलबजावणीची गरज असल्याचे लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वर्धापन दिनाच्या औचित्यपर ‘नेत्रचेतना, रक्तदान जागर’ हे अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समिती सभापती अजय पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वरसिंग ठाकरे, जि.प. सदस्य भूषण पाटील, माजी जि प सदस्य मंगेश पाटील, माजी पं. स. सदस्य अभय सोनवणे, ओबीसी तालुकाध्यक्ष आर के माळी, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, शेतकी संघाचे माजी संचालक जितेंद्र पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शहर उपाध्यक्ष सुजित पाटील, शुभम पवार, योगेश पाटील, चितेगाव ग्रा प सरपंच अमोल भोसले, संजय राठोड, देवेंद्र राजपूत, यज्ञेश बाविस्कर, प्रताप भोसले, आकाश पोळ, राजीव जाट, गौरव पाटील, जयदीप पाटील, अस्लम पिंजारी, गुंजन मोटे, राकेश राखुंडे, कौस्तुभ राजपूत, करण राजपूत, हृदय देशमुख, कुणाल पाटील, अजिंक्य पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *