नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील वीज तंत्रज्ञाचा कुजलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळला ; शेजारला दुर्गंधी येते असल्याने समजले..

नंदुरबार नवापूर माझं खान्देश

नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग महावितरण कंपनीच्या नवापूर उपविभाग अंतर्गत खांडबारा येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले योगेश मुरलीधर वाघ वय ३५ रा. सतीचे वडगाव ता. भडगाव जि. जळगाव हे गेल्या चार वर्षापासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीत कार्यरत असून ते खांडबारा येथील बर्डीपाडा येथे एकटे रूम करून राहत होते.

गेल्या महिन्याअखेर पासून ते महावितरण उपविभाग खांडबारा येथे बऱ्याच दिवसापासून गैरहजर होते. तर दिनांक 13 मे 2020 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खांडबारा महावितरण विभागाचे लिपिक शरद कोकणी यांना मयत योगेश वाघ यांच्या घरा शेजारील राहणारे मोबीन शेख जैनुल अबेदिन यांना त्यांच्या शेजारील घरातून दुर्गंधी येत असल्याचे खांडबारा महावितरण कार्यालयातील मुख्य तंत्रज्ञ राजाराम वाघ व लिपिक शरद कोकणी यासोबत योगेश वाघ यांच्या आले.

घरातच दुर्गंधी येत असल्यामुळे दरवाजा ढकलून खिडकी द्वारे पाहिले असता योगेश वाघ यांचे मृतदेह समोर खाटेवर फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत पडलेले दिसले घरातून दुर्गंधी जास्त प्रमाणात येत असल्याने घरात न शिरता खांडबारा दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात पोलिसांना कळविले असता.

लागलीच खांडबारा दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे सोबत घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चित्ते, अनिल राठोड, अतुल पानपाटिल, विजय वळवी, प्रविण अहिरे, तुषार पाडवी घटनास्थळी भेट दिली.

खांडबारा महावितरणचे तंत्रज्ञ मयत योगेश वाघ यास दारूचे व्यसन होते तर घरात तीन दिवसापुर्वीच मृत्यू झाला असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव तीन दिवसापासून मृत अवस्थेत पडल्यामुळे ते फूगन व कुजलेले असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना त्रास होत होता. त्याचे मृतदेह घरातुन दवाखान्यापर्यंत नेण्यास देखील मोठे अडचणीचे होते.

अशावेळी खांडबारा ग्रामपंचायत चे सफाई कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य योगेश चौधरी यांच्या सहकार्याने दवाखान्यापर्यंत मृतदेह नेण्यात आला. खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी संदिप वळवी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

मयत योगेश वाघ रा. सतीचे वडगाव ता. भडगाव जि. जळगाव येथील रहिवासी होता त्याच्या मृत्यू चा निरोप देण्यासाठी कुटुंबीयांना महावितरण विभागाचे कर्मचारी, पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कोरोना पार्श्वभूमी दाखवत येण्याचे टाळले.

मात्र माणुसकी धर्म पाळत ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे खांडबारा ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, महावितरणचे त्यांचे सहकारी, खांडबारा व विसरवाडी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *