नवापूर तालुक्यात 6 वेळा कारवाई झाल्याने लाकूड तस्करांचे धाबे दणाणले तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

क्राईम नंदुरबार नवापूर माझं खान्देश

प्रतिनिधी नवापूर ::> नवापूर तालुक्यात वनविभागाने एकाच आठवड्यात सहा वेळा कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वनतस्करांचे धाबे दणाणले आहे. शुक्रवारी नवापूर तालुक्यातील रायंगण गावात घरावर छापा टाकत अवैध लाकूडसाठा जप्त केल्यानंतर काही तासांत तालुक्यात विजापूर येथे छापा टाकला. त्यानंतर शनिवारी पुन्हा वनविभागाने भवरे येथे घरावर छापा टाकत कारवाई केली. लागोपाठ वनविभागाची कारवाई सुरू असल्याने वन्यप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात असून, अवैध लाकूडतस्करी करणाऱ्या तस्कारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल रायगंण फुलफळीतील संशयित आरोपी रणजित झालू गावित यांच्या घरावर छापा टाकत ४९ नग सागवान सिसम, शिवन प्रजातीचे लाकूड, एक रंधा मशीन एक बॉक्स दिवान जप्त केले. त्यानंतर विजापूर येथील संशयित आरोपी विनायक छोटू मावची यांच्या घरावर छापा टाकला असता २९ नग सागवान लाकूड जप्त केले. शनिवारी दुपारी भवरे येथे छापा टाकला असता १८ नग सागवान हस्तगत करून लाखोंचा अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे.

नवापूर वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्या पथकाने दोन दिवसांत ३ कारवाया करून ४ लाख ४० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. यामुळे वनतस्करांचे धाबे दणाणले असून, यापुढे ही अशीच कार्यवाही सुरू राहणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी दिली आहे.

वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्यावर अनेक वेळा वनतस्करांनी जीवघेणे हल्ले केले असूनही वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी निर्भीडपणे कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कुठेही अवैध वाहतूक, तस्करी किंवा अवैध लाकूडतोड संदर्भात वनविभागाला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल. यासंदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *