मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे आज मुक्ताईनगर येथे ” रोहित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना कोविड सेंटर मध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले व तहसिलदार यांना शासकीय, मका, ज्वारी, कापुस उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार शाम वडकर यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना मुळे आधीच हाता तोंडाशी आलेला कापुस, व्यापारी हा कवडीमोल प्रति क्विंटल रुपये 2200 मध्ये घेत आहे, तरी प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली, कुऱ्हा, मुक्ताईनगर, येथे त्वरित शासकीय ज्वारी, कापुस, मका, खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या वर्षी खरीप हंगाम चांगला असुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुटमार होणार नाही याची दक्षता घेऊन हंगामाच्या सुरवातिलाच शासकीय खरेदी केंद्र चालू करावे, या मुळे शेतकऱ्यांची सोय होईल अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील, वारकरी जिल्हा अध्यक्ष विशाल खोल्हे महाराज, जि सरचिटणीस, प्रविन दामोदरे ,तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर , कार्य अध्यक्ष सोपान दुट्टे, तालुका महिला अध्यक्ष लता ताई सावकारे, तालुका युवक अध्यक्ष सईद खान , उपाध्यक्ष राजेश ढोले ,शहर अध्यक्ष ऋषिकेश पाटील , वि. सभा क्षेत्र प्रमुख सौरव सपकाळे , संजय भोई, शाखा अध्यक्ष किशोर पाटील , शाखा उपाध्यक्ष मयुर लोणे, संजय निंबोळे, शुभम पाटील ,प्रदीप पाटील, सुपराव देशमुख, सर्व शेतकरी बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तित होते.