पोलीस पाटलांना कोरोना विमा कवच मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : रोहिणी खडसे खेवलकर

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा मुक्ताईनगर

गावपातळीवर महसूल आणि पोलिस खात्याचा म्हणजेच प्रशासनाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील


मुक्ताईनगर येथे संवेदना फाउंडेशन तर्फे पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::>
कोरोना आपत्ती मध्ये ग्रामीण भागात
अव्याहतपणे सेवा देऊन कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनास मदत करणारे पोलिस पाटील यांचा मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्ष असलेल्या संवेदना फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र, मास्क सॅनिटाईजर देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी उपस्थित पोलीस पाटील बंधूंना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या, गावपातळीवर महसूल आणि पोलिस खात्याचा म्हणजेच प्रशासनाचा दुवा होऊन तुम्ही पोलिस पाटील काम करत असतात.

गावातील नैसर्गिक आपत्ती, शेतकरी आत्महत्या, शेतसारा माहिती संकलन अशी व या स्वरूपातील महसुली कामांची प्राथमिक माहिती प्रशासनास देणे. सोबतच गावातील तंटे, हत्या, मारामारी व शांतता राखण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यास प्रथम माहिती अहवाल देण्याची जबाबदारी तुम्हा पोलीस पाटलांवर आहे. हे काम करत असताना तुम्ही वेळेचे कुठलेही बंधन पाळत नाही.


कुटुंब वाऱ्यावर सोडून पोलिसांच्या दिमतीला राहणाऱ्या तुमच्या पोलीस पाटलांना गावातील संभाव्य घडामोडीची गोपनीय माहिती पोलिसांना कळविण्याचीही कसरत करावी लागते. गावच्या तंटामु्क्ती समितीचा सचिव म्हणून आपण काम करत असतात.
त्याचबरोबर सध्या उद्भवलेल्या ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर ‘करोना’ निर्मूलन समितीचा सचिव म्हणूनही तुम्ही पोलिस पाटील जबाबदारी पार पाडत आहेत. त्याअंतर्गत ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर बाहेरील लोकांना गावात येण्यापासून प्रतिबंध करणे, गावात आलेल्यांच्या याद्या अद्ययावत करून प्रशासनाला देणे, लोकांनी ‘लॉकडाउन’च्या काळात घराबाहेर येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये वारंवार जागृती करणे ही कामे तुम्ही पोलिस पाटील करत आहेत.
म्हणूनच पोलीस पाटलांना
ग्राम पातळीवर शासनाचे ‘कान व डोळे’ म्हटल्यास वावगे ठरू नये असे मला वाटते
यावेळी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने रोहिणी खडसे खेवलकर यांना पोलिस पाटील यांना शासनातर्फे कोरोना विमा कवच मिळावे यासाठी पाठपुरावा करणे साठी निवेदन देण्यात आले त्यावर माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे रोहिणी खडसे खेवलकर यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना आश्वासन दिले.


यावेळी मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमाताई तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती राजुभाऊ माळी, भाजप तालुका उपाध्यक्ष कैलास वंजारी,शिवराज पाटील,
पोलीस पाटील संघटनेचे दिपक चौधरी, विजय पाटील,अलकाताई महाजन,वृषाली ताई भोलाणकर,कैलास बेलदार, ऋणाली ब-हाटे, सविता बढे, अनिल पाटील, जितेंद्र पाटील, मनोज महाजन, स्नेहलताई काळे, रेखाताई चव्हाण, अर्चनाताई सवळे,वर्षाताई चौधरी, दिलीप सोळुंखे,प्रदीप काळे, संजय चौधरी ,व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी प्रा विजय डांगे यांनी सूत्रसंचालन केले तर कोथळी पोलीस पाटील संजय चौधरी यांनी उपस्थित तांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *