कुऱ्हा काकोड्याचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची हत्या

क्राईम मुक्ताईनगर

मुक्ताईनगर >> तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची हत्या मध्यरात्री करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. सकाळी पेट्रोल पम्पच्या बाजूला पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली असून या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आहे.

कुऱ्हा येथील पेट्रोल पंपावर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील आज मध्यरात्री अज्ञात व्यक्तींने गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील वढोदा, निमखेडी तसेच परिसरात खूनाच्या घटनेने भितीचे वातावरण विविध तर्कवितर्क होत आहे. कुऱ्हा गावचे पोलीस पाटील विजय पाटील यांनी पोलीसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान हत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनस्थळी पोलीस उपनिरीक्षक निलेश साळुंखे यांनी श्वान पथक मागविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *