जि.प.च्या माध्यमातून केंद्राच्या योजना राबवण्यासाठी खासदार उन्मेष पाटील घेणार पुढाकार

Jalgaon Politicalकट्टा Social कट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::>जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना राबवून विकास कामे व्हावीत, यासाठी स्वपक्षीय सदस्यांच्या मदतीला आता खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

मंगळवारी त्यांनी जि.प. पदाधिकारी व सीईओ यांची भेट घेत केंद्राच्या योजनांसदर्भात लवकरच बैठक बोलावून या योजना कशा राबवता येतील, या विषयांचे नियोजन करण्याच्या सूचना सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांना दिल्या.

दरम्यान, सोमवारी खासदार पाटील यांनी महापालिकेत जाऊन भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या दालनात बसून सदस्यांचे संख्याबळ, सद्य:स्थिती याविषयी माहिती जाणून घेतली.

कोरोनामुळे यंदा आरोग्य व्यतिरिक्त कोणत्याही विभागास मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नाही. त्यामुळे सर्वच गटांमध्ये कामे होत नसल्याची स्थिती आहे. यावर पर्याय म्हणून व पक्षाचे कार्य टिकवून राहण्यासाठी केंद्राच्या योजनांचा कसा फायदा करून घेता येईल, यावर चर्चा केली.

या योजनांची माहिती सदस्यांना कशी देता येईल, सदस्यांचे निधी विषयीचे प्रश्न यासाठी भाजप सदस्य व केंद्राच्या योजनांचे अधिकारी यांची बैठक घेण्याची मागणी डॉ. पाटील यांच्याकडे केली.