साकळीचे मनसे कार्यकर्ते संताेष महाजन व प्रविण माळी यांचा शिवसेनेत प्रवेश

Politicalकट्टा कट्टा यावल साकळी

साकळी ता.यावल >> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साकळी शाखाप्रमुख संताेष सुरेश महाजन तसेच कार्यकर्ते प्रविण पुंडलिक माळी या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.

शिवसेनेची यावल तालुक्याची बैठक आज दि २० रोजी यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी हा प्रवेश सोहळा पार पडला.

राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघा कार्यकर्त्यांना शिवसेनेचा ‘भगवा स्कार्प ‘ शिवसेनेत प्रवेश देण्यात आलेला आला व त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार(मुन्ना)पाटील,तालुकाप्रमुख रवि सोनवणे, गोपाळ चौधरी, यावलच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा कोळी, माजी नगराध्यक्ष जगदीश कवडीवाले, सेनेचे साकळी- दहिगाव गटाचे गटप्रमूख महेंद्र चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर काळात गावातील अजून काही कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला जाणार आहे . संतोष महाजन यांचेकडे सध्या माळी महासंघाच्या यावल तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी असून त्यांचा उत्तम असा जनसंपर्क व सामाजिक कार्य आहे.

संतोष महाजन व प्रविण माळी यांच्या तसेच इतर कार्यकर्त्यां सेनेतील प्रवेशामुळे गावातील भविष्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. तसेच येत्या काळात गावातील अनेक पदाधिकारी व युवक- कार्यकर्ते शिवसेनेत जाणार असल्याने गावात शिवसेनेची एक मोठी ताकद वाढणार आहे यात शंका नाही.सेनेत प्रवेश केलेल्या संतोष महाजन यांच्याकडे साकळीगाव शिवसेना शाखा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.