रिड जळगाव >> पाचोरा-भडगांव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या पत्नी पाचोरा नगरीच्या माजी नगराध्यक्षा, तथा नगरसेविका, तसेच महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनिता किशोर पाटील यांनी सुध्दा कोवीड – १९ चाचणी तपासणीसाठी दिली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट आता पाॅझिटिव्ह आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे.