रस्ते दुरुस्तीसाठी आमदार राजेश पाडवी यांनी घेतला पुढाकार

Politicalकट्टा कट्टा नंदुरबार माझं खान्देश

तळोदा ::> तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उसाची वाहतूक करताना चालकांना कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जेसीबी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे काम वेगात होत आहे.

ऊस तोडणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी तालुक्यात मजूर दाखल झाले आहे. शेतातील रस्ते अरुंद असून, बऱ्याच ठिकाणी फरशी धसली आहे. त्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागते. काही वेेळा उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात होतो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार राजेश पाडवी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी स्वखर्चातून जेसीबी उपलब्ध करून दिले आहे. रस्त्यांवर भराव करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.