राज्य सरकारमुळे धान्य खरेदी ठप्प : आमदार मंगेश चव्हाण

Politicalकट्टा कट्टा चाळीसगाव महाराष्ट्र शेती

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना त्या अंतर्गत मका, ज्वारी व बाजरी या धान्य पिकांची २० टक्केही खरेदी झालेली नाही. केंद्र सरकारने खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मागितलेली माहितीही राज्यातील महा विकास आाघाडी सरकारने दिली नाही. त्यामुळे या सरकारचे शेतकरी प्रेम केवळ नाटकी असल्याची टीका तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

खरीप हंगाम २०२०-२१ साठी ५६० शेतकऱ्यांनी मका, १२३ शेतकऱ्यांनी बाजरी व ११२ शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ मका ८० शेतकरी, बाजरी ३९ शेतकरी व ज्वारी ६२ शेतकरी एवढीच खरेदी शासनातर्फे १६ डिसेंबरपर्यंत करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना शासनाचे खरेदी उद्दिष्ट संपल्याचे कारण सांगून खरेदी नाकारण्यात आली. २० टक्के देखील मका, बाजरी खरेदी झाली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांसह पणन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केल्याची माहितीही दिली.