आ.लता सोनवणे यांच्या हस्ते निंबादेवी धरणाचे जलपुजन

Politicalकट्टा कट्टा


मनवेल ता.यावल वार्ताहर ::> मंगळवारी लघु पाटबंधारे योजना निंबादेवी तालुका यावल येथे आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.


या प्रकल्पाचे मुख्य माती धरण मुख्य विमोचक व प्रवेश आणि कालव्याचे खोदकाम तसेच सांडव्या चे ही काम पूर्ण झालेले आहेत तसेच पुच्छ कालव्याचे धूप प्रतिबंधक कामे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पावर आतापर्यंत ९.०६ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सावखेडासीम शिवारातील ३०६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहेत.

या प्रकल्पाच्या उर्वरीत काम करण्यासाठी ५.१२ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर २.४८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण होणार आहे.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष साळुंके, शिरसाड सरपंच प्रवीण सोनावणे, योगेश पाटील, प्रकाश कोळी, आशिष झुरळकर, समाधान सोनावणे, गोकुळ कोळी, इस्माईल तडवी, गोटू सोळुंके, धनराज पाटील, श्रावण कोळी, भाऊसाहेब धनगर, एल. व्हि. पाटील, धनराज पाटील, दिनेश सोळुंके, उपविभागीय अभियंता तपासे, शाखा अभियंता अढे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *