१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळविले ; गुन्हा दाखल

Shirpur क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे >> शिरपूर तालुक्यातील भोईटी गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोईटी गावातील १६ वर्षीय मुलगी रात्रीच्या वेळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. त्यानंतर महादेव दोंदवाड गावातील रमेश गुलाब पावरा याचे नाव समोर आले. रमेशने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यावरुन शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.