मास्कच्या जनजागृतीसाठी दुकानांवर चिकटवणार पोस्टर; मनपा, एकता पतसंस्था राबवणार उपक्रम

Jalgaon Social कट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::>शहरातून कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी देखील अजूनही काेराेना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी जळगाव शहर महापालिका आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था जनजागृती करणार आहे. रविवारी या जनजागृती पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

नागरिकांना मास्कबाबत जागरूक करण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. एकता पतसंस्थेकडून शहरातील प्रत्येक किराणा दुकानावर जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात येणार आहे. रविवारी मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक महेंद्र पवार, एकता रिटेल किराणा पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास ललवाणी, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते, युथ फॉर हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टर मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.