चिमठाणेत विवाहितेची आत्महत्या, दोघांची कारागृहात रवानगी

क्राईम धुळे माझं खान्देश शिंदखेडा

धुळे प्रतिनिधी ::> शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील विवाहिता शीतल धनगर हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती व सासूला अटक केली आहे. दोघांची मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.


चिमठाणे गावातील शीतल नवल धनगर या विवाहितेने सोमवारी सकाळी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत शीतलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी रात्री शीतलवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा पती नवल चिंतामण धनगर, सासू शेवंताबाई चिंतामण धनगर यांना अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक सुशांत वळवी तपास करत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.