मनवेल ता.यावल (वार्ताहर ) : >> महसुल विभागातील शेवटच्या कणा असलेल्या कोतवाल यांच्या गेल्या ६० वर्षा पासून चतुर्थे श्रेणी दर्जा व विविध मागण्यासाठी वारंवार निवेदन देऊन हि समस्या सुटत नसल्यामुळे रावेर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटने मार्फत यावल – रावेर विधानसभा मतदार संघाचे आ.शिरीषदादा चौधरी यांना निवेदन दिले.
मागच्या सरकारने तुटपुंची दोन हजार पाचशे रुपयांची वाढ केली.पन्नास वर्षा वरील कोतवालांना पंधरा हजार रुपये व इतर कोतवालांना सात हजार पाचशे रुपये अशी तफावत आहे करुन अन्याय केला आहे मानधनी कर्मचाऱ्यांना समान पगार असतो मात्र कोतवालांना विविध अडचणीना सामना करावा लागत आहे.
सात हजार पाचशे रुपयात कुंटुंबांचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.सर्व कोतवालांना एक समान काम असून एक समान वेतन मिळावे व ग्रामपंचायत कर्मचारी प्रमाणे कीमान वेतन मंजूर करावे.पदवीधर कोतवालांना तलाठी व तत्सम पदांत ५०% आरक्षण द्यावे व कोतवालाची ६० वर्षापूर्वीची मागणी चतुर्थे श्रेणी देण्या बाबत विचार करण्यात याव्यात या मागण्यांचे निवेदन आ.शिरीषदादा चौधरी यांना देण्यात आले असुन एक प्रत महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आली असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सचिन कोळी यांनी माहीती दिली
या निवेदनावर गणेश चौधरी, विनोद अटवाळे, गोपाल बेलदार, महेद्र चौधरी ,विकास माळी, प्रविण धनके यांच्यासह तालुक्यातील कोतवाल उपस्थित होते.