मनवेल व दगडी येथील ग्रामस्थांची थर्मामीटरणे घरोघरी तपासणी

यावल सिटी न्यूज

मनवेल ता.यावल (वार्ताहर) >> कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. चौथ्या लोकडाऊनमध्ये बाहेर गावाहुन मुंबई ,पुणे तसेच शहरातुन मुळगावी येणारांची संख्या वाढत आहे. या ग्रामीण भागामध्ये कुठलीही तपासणी यंत्रसामग्री नसल्यामुळे आरोग्य विभाग व आरोग्य सेवक, आशा वर्कर यांना सर्वेक्षणामध्ये तपासणी साठी खुप आडचणींना सामोरे जावे लागत होते. मनवेल ग्रामपंचायने दोन थर्मामीटर खरेदी केली असुन गावात घरोघरी आशावर्कर रंजना कोळी ,अंगणवाडी सेविका कल्पना पाटील, मदतनीस अलका इंधाटे घरोघरी जावुन नागरीकांची तपासणी करीत आहे. प्रथम घरोघरी सँनिटायझर वाटप करण्यात आले व आता थर्मामीटरणे शारिरीक तापमान तपासणी संपूर्ण गावामध्ये चालु करण्यात आले आहे.अशी माहीती ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *