महर्षी वाल्मीक जयंती घरीच साजरी करा : जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे

Social कट्टा कट्टा यावल साकळी

यावल प्रतिनिधी ::> आद्य कवी महर्षी वाल्मीक जयंती कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे आदीवासी कोळी समाज बांधवानी घरीच साजरी करावी असे आवाहन कोळी समाज जिल्हाध्यक्ष तथा जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले आहे.

३१ ऑक्टोबर रोजी आद्य कवी महर्षी वाल्मीक जयंती असुन कोवीड १९ च्या प्रादुर्भाव असल्यामुळे कुठेही मिरवणूक न काढता घरीच साजरी करावी व शासन आदेशानुसार शासकीय कार्यलयात सकाळी दहा वाजता वाल्मीक जयंती साजरी करण्याचा निर्णय असुन यावल तहसिलदार कार्यलयात साजरी करण्यात येणार आहे. तरी समाज बांधवानी वाल्मीक जयंती साजरी घरी करावी असे आवाहान जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे भरत कोळी, जांलधर कोळी ,अजय कोळी ,प्रमोद कोळी, अमर कोळी, गोकुळ तायडे गंगाराम तायडे ,समाधान सोनवणे यानी केले आहे.