जळगावात प्रेयसीसाठी पत्नीसह मुलांना काढले घराबाहेर ; सासू, पतीसह प्रेयसीवर गुन्हा दाखल

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::> पत्नी, पत्नीचा संसार सुरळीत सुरू असताना त्याची दोघांमध्ये एन्ट्री झाली. पतीचे नातेवाईक म्हणून ती घरात वावरत होती. पत्नीला तिच्यावर संशय आला. मात्र, दोघांचे फोटो बघितल्यानंतर सत्यता पटली. प्रेयसीसाठी पतीने स्वत:च्या पत्नीसह मुलांना घराबाहेर हकलले. अखेर पती, पत्नी और वो चा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आणि सासू, पतीसह त्याच्या प्रेयसीविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील बांभोरी नाक्याजवळ राहणाऱ्या विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या महिलेचे शेतीपयोगी साहित्य विक्री करणाऱ्या युवकाशी लग्न झालेले आहे.

लग्नामध्ये ५० हजार रुपये, अंगठी, टोंगल, टॉप्स व मंगलपोत असे दागिने वडिलांनी दिले होते. कुटुंबातून विभक्त झाल्यानंतर माहेरावरून दीड लाख रुपये आल्यानंतर दाम्पत्याच्या नावावर घर झाले. काही दिवसांपासून एक महिला त्यांच्या घरी यायची. पतीला तिच्याबाबत विचारल्यानंतर नातेवाईक असल्याचे सांगत होता. मात्र, त्या दोघांचे फोटो पत्नीच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोघांच्या संसारात वितुष्ट यायला सुरुवात झाली. त्या महिलेने सासूला या प्रकाराबाबत सांगितले. हा प्रकार सांगितल्यानंतर सासूने छळ करण्यास सुरुवात केली.

२३ ऑक्टोबर रोजी पती व सासूने अंगावरील दागिने काढून घेतले. दोन मुलांसह त्या विवाहितेला घराबाहेर हकलले. पतीच्या प्रेयसीने तिला शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी त्या विवाहितेच्या फिर्यादीवरुन सासू, पती व त्याची प्रेयसी या तिघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात घर घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने छळ करुन अंगावरील दागिने काढून घराबाहेर हकलून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.