खासदार रक्षा खडसेंनी कृषी कायदा कसा फायद्याचा हे सांगावे!

Politicalकट्टा कट्टा मुक्ताईनगर

मुक्ताईनगर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांचा सवाल

मुक्ताईनगर ::> कृषी कायदा जनतेच्या फायद्याचा असेल तर खासदार रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांसमोर त्याचे फायदे सांगावेत. बाजार समितीच्या माध्यमातून यापूर्वी हमीभाव मिळत असे, मात्र या कायद्यामध्ये हमीभाव नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांना नाडतील व मनमानी वाढेल.

केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, याची जाणीव असतानाही खासदार रक्षा खडसे केवळ पक्षादेश म्हणून या कायद्याचे समर्थन करीत असतील आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतील तर शेतकऱ्यांच्या मतांवर संसदेत निवडून गेलेल्या खासदारांकडून ही शेतकऱ्यांचीच प्रतारणा आहे, असा आरोप मुक्ताईनगर येथे विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला.

श्री. जाधव म्हणाले, अंबानी, अदानीसारखे उद्योजक गटशेती करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील व देशात संस्थानिक राज्य येईल म्हणून या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून, खासदार केळीपासून पट्ट्याच्या असतानासुद्धा केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मागतील काय, हादेखील प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *