यावल येथे उद्या कोळी समाज बांधवाची महत्वाची बैठक

Social कट्टा कट्टा यावल सिटी न्यूज

यावल गोकुळ कोळी >> सर्व अन्याय ग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधवाची माजी मंत्री दशरथजी भांडेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली दि ९ डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनाबाबत बैठक जिनींग प्रेसिंग सभागृह यावल येथे २१ नोव्हेंबर रोजी शनिवारी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष नितीनजी कांडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अँड़.गणेश सोनवणे संयोजक, यावल तालुका जि.प.सदस्य तथा गटनेते प्रभाकरआप्पा सोनवणे, प्रल्हाद सोनवणे उत्तर विभागीय उपाध्यक्ष. श्री मंगल कोळी जि अध्यक्ष. कर्मचारी संघटना. श्री प्रशांत सोनवणे जि. युवक आघाडी. मा. सुनीताताई कोळी महिला आघाडी यांच्या प्रमुख उपस्तितीत करण्यात आली आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने समाजातील तरुण बांधवानी व कर्मचारी वर्गानी तसेच जेष्ठ श्रेष्ठ समाज बांधवानी उपस्तित राहावे भरत कोळी यावल, आकाश कोळी, श्री गोकुळ कोळी मनवेल, किरण कोळी दहिगाव, अमोल कोळी यावल, अनील कोळी. निमगाव, डिगंबर कोळी, दत्तात्रय नन्नवरे यावल. योगेश कोळी. समाधान सोनवणे थोरगव्हाण ,गजानन कोळी पींप्री, रोहिदास कोळी, गंगाराम तायडे साकळी, जालंदर व्ही कोळी (प्रसिद्धी प्रमुख आदिवासी संघर्ष समिती यावल) यांनी केले आहे