किनगाव घरफोडी प्रकरणी दोन संशयित अटकेत

किनगाव क्राईम यावल

यावल ::> तालुक्यातील किनगाव येथील आत्माराम नगरात झालेल्या घरफोडी प्रकरणी येथील पोलिसांनी गावातीलच दोन संशयितांना अटक केली. त्यांना चार दिवस पोलिस कोठडी मिळाली.

किनगाव येथील डिगंबर पाटील त्यांच्या बंद घरातून चोरी झाल्याचे ११ रोजी उघड झाले. चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण १ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी पोलिसांनी गावातील मंगेश जगन्नाथ खुरपडे व साहेबराव आधार महाजन यांना संशयित म्हणून शनिवारी अटक केली आहे. त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक अरूण धनवडे, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार सुनील तायडे करत आहेत.