दोंडाईच्यातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> दोंडाईचातील डाबरी घरकुल परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या वडिलांनी याबाबत एकावर संशय व्यक्त केला आहे. डाबरी येथील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. पहाटेच्या वेळी ती राहत्या घरातून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेऊन देखील ती मिळून आली नाही.

यानंतर जगदीश ऊर्फ विक्की नामक एकाचे नाव समोर आले. जगदीश यानेच मुलीला काही तरी आमिष दाखवून पळवून नेले. असा संशय पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यावरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *