१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे ::> तालुक्यातील मोरशेवडी येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले असावे, असा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. त्यावरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मोरशेवडी गावातील १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ती राहत्या घरातून निघून गेली. सर्वत्र शोध घेऊनही ती आढळली नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या मामाने धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने मुलीला आमिष दाखवून पळवून नेले आहे. त्यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *