जामठी येथे दोन गटांमध्ये हाणामारी; युवक जखमी

क्राईम जळगाव

जामठी प्रतिनिधी >> गाडीमध्ये मोठ्या आवाजामध्ये गाणे वाजवण्याच्या कारणावरून जामठी येथे रविवारी दुपारी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला.

जामठी येथील बसस्थानकावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या एका खाजगी अॅपे रिक्षामध्ये टेपरेकॉर्डरद्वारे जोरात गाणे वाजवू नको व गाण्याचा आवाज कमी असे येथील युवकाने सांगितले.

मात्र त्याची कुठलीही दखल न घेतल्याने जामठी- लोणवाडी येथील युवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात येथील युवकाला लोणवाडी येथील एका गटाकडून लाठ्या-काठ्यांद्वारे बेदम मारहाण करण्यात आली. त्यात हा युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.