शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या; संभाजी ब्रिगेड

जामनेर

जामनेर प्रतिनिधी::> अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सभांजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे केली अाहे.

या वेळी कांदा निर्यात बंदी उठवावी, कर्ज माफी योजनेत पात्र असणाऱ्या काही शेतकऱ्यांना अजुनही कर्जमाफी मिळत नसल्याने तो लाभ तत्काळ मिळावा आणि नवीन पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असून त्यांना समज देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात अाल्या अाहेत.

साेमवारी जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार अरुण शेवाळे यांना हे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा अांदाेलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात अाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *