जामनेर : पळासखेडा फॉरेस्ट परिसरामध्ये टाकला अवैद्यरित्या कचरा ; वन्यप्राणी-नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळताय देऊळगाव ग्रुप-ग्रामपंचायत ? युवासेनेने दिला आंदोलनाचा इशारा

Politicalकट्टा जामनेर

जामनेर प्रतिनिधी:>> जामनेर तालुक्यातील देऊळगाव-पळासखेडा या ग्रुप-ग्रामपंचायतीने अवैद्यरित्या आणि अतिशय निष्काळजीपणे पळासखेडा काकर गावालगत असलेल्या फॉरेस्ट परिसरामध्ये देऊळगाव गावातील संपूर्ण कचरा टाकुन वण्यप्राण्यांच्या आणि पळासखेडा गावातील नागरीकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप करत युवासेनेकडून ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायतीने आपले स्वतःचे एक डंपिंग एरीया तयार करून संपूर्ण कचर्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते..असे न करता संपूर्ण कचरा अवैद्यरित्या फॉरेस्ट परिसरामध्ये टाकुन प्रदूषणाला वाढ देत आहे.याबाबत वनविभागा तर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नसून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.

निवेदनात असे म्हटले आहे की, पुढील 10 दिवसात संपूर्ण कचरा दुसऱ्या ठिकाणी हलवून योग्य विल्हेवाट न लावल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा युवासेने कडून देण्यात आला.

कचऱ्यामुळे भविष्यात एखादे विपरीत परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन गावातील दोन-तीन गुरांचा मृत्यू झाला आहे याला जबाबदार कोण…अशी फटकार यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख रोहन राठोड यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांना लगावली.

यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख रोहन राठोड, शाखाप्रमुख गोपाल तंवर, शुभम राठोड आणि भावसिंग राठोड, कमलेश वाकोडे, अमोल राठोड, कृष्णा पवार, दिपक राठोड, सोपान राठोड, दिनेश राठोड, अविनाश राठोड आदि युवासैनिक उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *