वाकोद येथे वीर शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण!

जामनेर

भारत-चीन सीमा तणावातून सोमवारी लदाख खोऱ्यातील गलवाण भागात भारत व चीन सैन्यात झटापट होऊन भारताचे वीस वीर जवान शहीद झाले. या भारत मातेच्या शुर विरांना वाकोद येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सरपंच अलिम शेख, तलाठी डी. के.घुरके, ग्रामसेवक सी.एस वाघमारे, ग्रा.प.सदस्य सुरेश जोशी, विनोद राऊत, रवींद्र(भैय्या)भगत, महेंद्र पांढरे, अर्पण लोढा, किशोर भगत, शंकर टेलर, धनराज गोसावी, रामदास वडर, वैभव नरवाडे, अक्षय गायकवाड, श्रीकांत जोशी, JDCC बँक मँनेजर प्रफुल पाटील, राजु पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *