शेतीच्या बांधावरून वाद झाल्याने शेतकऱ्यास बेदम मारहाण ; ५ जणांविरूद्ध गुन्हा

क्राईम जामनेर पाेलिस

जामनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथे शेतकऱ्यास बेदम मारहाण प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेताचा रस्ता नांगण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले.

फिर्यादी भागवत दगडू घुगे हे हरभरा पेरणीसाठी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मशागत करत होते. यावेळी तेथे आलेले संशयित ज्ञानेश्वर कडूबा पाटील, भगवान किसन राजपूत,भरत किसन राजपूत, भीका रामदास राजपूत, भीमराव रूपचंद राजपूत यांनी घुगे यांना रस्ता का नांगरत आहे ? अशी विचारणा केली. यावरून वाद झाला. त्यात वरील पाचही संशयितांनी शिविगाळ व बेदम मारहाण केली. तपास अतुल पवार करत आहेत.