रिड जळगाव प्रतिनिधी ::> जामनेर येथील तरूणीला आपल्या जाळ्यात ओढत तिचे अश्लील फोटो मिळविले. त्याच फोटोंच्या आधारे शुभम बोरसे याने तरूणीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीची शुभम कैलास बोरसे या तरूणाशी मैत्री झाली. शुभम याने तरूणीला लग्नाचे आमिष देत प्रेमाच्या जाळ्यात ओढले व विश्वासात घेऊन तिचे काही फोटो मिळविले. त्या फोटोंचा शुभम कडून गैरवापर होऊ लागला. शुभम याने आर्थिक अडचण दाखवून तरूणीकडे उसनवार पैशांची मागणी केली. त्यानंतर वारंवार पैशांची मागणी करीत असल्याने अखेर तरूणीने शुक्रवारी जामनेर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन शुभम बोरसे याच्याविरूध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम हा सेवानिवृत्त पोलिस हवालदाराचा मुलगा आहे.