जामनेरकरांसाठी धक्कादायक बातमी तालुक्यात आज ६ रुग्ण कोरोना बाधित!

जामनेर

जामनेर >> तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जामनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत ६ रुग्णांची भर पडली आहे.

आज जामनेर शहरात पाचोरा रोड, सुतार गल्ली, दत्ता चैतन्य नगर येथील एकूण ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर शेंदुर्णी येथे १ आणि लोंढरी येथील १ रुग्ण जो जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.

जामनेर तालुक्यात रुग्णाची संख्या १३२ झाली असून १० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ७८ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *