जामनेर येथील नाचणखेडा सबस्टेशनजवळ छोटा हत्ती वाहनाचा अपघात ; ५ गंभीर जखमी

क्राईम जामनेर

जामनेर >> येथील नाचणखेडा सबस्टेशनजवळ शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणार्‍या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला.

या अपघातामध्ये ५ मजूर गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाळधी (ता. जामनेर) येथे शेतीकामासाठी मजूरांना घेऊन छोटा हत्ती हे वाहन जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाचणखेडा सबस्टेशनजवळ हे वाहन उलटले.

या अपघातामध्ये गंभीर जखमी गयाबाई सुखदेव माळी (वय ६५), मंगलाबाई सुकलाल सोनार (५०), सुवर्णा किरण माळी (१७), सुपडाबाई तुकाराम चौधरी (३८), चारुदत्त विलास थोरात (२५) हे झाले असून तर किरकोळ जखमी मैनाबाई राजपूत, विमलबाई पाटील, सविता माळी, मनीषा चौधरी, शोभाबाई पवार, अश्‍विनी माळी, सगुनाबाई गीते, जनाबाई मधुकर निकम, सिंधुबाई पाटील, निर्मलाबाई सोनार, मंगलाबाई राजपूत (सर्व रा.लोहारा) हे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *