जळगाव ::> जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत भररस्त्यावर वाढदिवस साजरा करून फटाके फोडणाऱ्या सहा जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तरुणांनी सोमवारी रात्री ८.३० वाजता फुले मार्केट परिसरात रस्त्यावर हा प्रकार केला. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्याला बंदी घालण्यात अाली अाहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणे या तरुणांना भाेवल्याचे या प्रकारावरून समाेर अाले.
शैलेंद्र चंद्रकांत खेडकर (वय ३२, रा. कांचननगर), किरण बाळू कोळी (वय १९, रा. वाल्मीकनगर), भूषण प्रल्हाद कोळी (वय २३, रा. घरकुल, वाल्मीकनगर), शेखर नामदेव ठाकूर (वय २५), खुशाल दिलीप ठाकूर (वय १७), तुषार काशिनाथ कोळी (वय १८, तिघे रा. वाल्मीकनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांनी त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भरस्त्यावर फटाके फोडले. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले. फटाक्यांचा आवाज आल्यामुळे शहर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.