चाळीसगाव प्रतिनिधी >> चाळीसगाव येथील हुडको परिसरात तरुणावर दुचाकीने आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणात जळगाव येथील एका युवकाला पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
शहरातील नागद रोड परिसरातील हुडको भागातील तरुण जुबेर उर्फ बंबय्या याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ३० रोजी एलसीबी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जळगाव येथील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या अरबाज दाऊद पिंजारी (वय २४) या युवकास धुळे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे समजते.