जळगाव >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १५ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदतवाढ केली आहे.
विद्यापीठातर्फे ऑक्टोबर, २०१९ व त्यापूर्वी घेतलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि पीएचडीधारक अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्यानुसार विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी. पी. पाटील यांनी कळवले आहे. तसेच माहे एप्रिल/मे २०२०च्या होणाऱ्या परीक्षणामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरणेसाठी स्वतंत्र कालावधी जाहीर करण्यात येईल.