जळगाव : खेडी येथे ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी : >> खेडी येथे प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. मदन प्रभाकर जातूद वय ४५ रा. हुडको कॉलनी, खेडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


कुटुंबियांनी त्यांना देवकर कॉलेजातील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी डॉ.अतुल पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो.कॉ. संदीप धनगर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *