जळगाव ::> जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालयाकडून रेल्वे रूळ ओलांडून जाण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली असून मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांनी आंदोलन करू नये, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष देशपांडेसोबत चर्चा करतांना केली.
जळगावातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडण्यास परवानगी दिली. मात्र याबाबतची चर्चा रेल्वे प्रशासनाने मनसे सोबत शनिवारी केली. रेल्वे प्रशासनाने मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच मनसेने आंदोलन करू नये,अशी विनंती केली.
तसेच तहसील कार्यालया समोरील रेल्वे रूळ ओलांडून शिवाजी नगर परिसरातील नागरिक जाऊ शकतो त्यांना कोणी अटकाव करणार नाही, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी करण्यात आली असल्याचे प्रत्यक्ष दाखवून दिले. तर नागरिकांनी फक्त तेथूनच रूळ ओलांडून जावे. अन्य ठिकाणी रूळ ओलांडू नये, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या ठिकाणाहून लोटगाडी, मोटरसायकल घेऊन जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी, असेही सांगितले. दरम्यान, लवकरच रेल्वेचा जिना वापरण्याबाबत पण निर्णय होईल. या करिता वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही रेल्वे प्रशासनाने मनसेला सांगितले.