शिवाजीनगरातील जेके जिनींगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या ; पोलीसात तक्रार

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> शिवाजी नगर भागातील जेके जिनींग परिसरात उभ्या असलेल्या सहा ट्रकच्या कॅबिनमधून वायरी तोडत चोरट्यांनी बॅटर्‍या लांबविल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. सतत महिन्याभारांपासून ट्रकमधील बॅटर्‍या चोरीला जात असल्याने ट्रकचालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जे.के. जिनिंगच्या मोकळ्या मैदानात नेहमीप्रमाणे ट्रक उभे केले होते. शुक्रवारी सकाळी संबंधित ट्रकचे मालक मालवाहतुकीसाठी ट्रक घेण्यासाठी गेले असता, याठिकाणी हबिब पटेल यांच्या ट्रकसह लक्ष्मण पोळ, दिलीप चौधरी यांच्या ट्रकच्या कॅबिनचा दरवाजा तोडून ट्रकमधील बॅटर्‍या लांबविल्याचे समोर आले.

गेल्या 20 दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल अशोक परदेशी यांच्यासह मंजूर शेख यांच्या ट्रकमधून अशा एकूण तीन बॅटर्‍या चोरट्यांनी लांबविल्या होत्या. बॅटरी चोरी झाल्यानंतर मंजूर शेख यांनी नवीन बॅटरी बसविली. ही नवीन बॅटरीही चोरट्यांनी लांबविली आहे. याप्रकरणी तक्रारीसाठी स्वप्निल परदेशी, यांच्यासह हबिब पटेल, लक्ष्मण पोळ, दिलीप चौधरी व इतर ट्रकचालकांनी शहर पोलीस स्टेशन ठाणे गाठले. संबंधित प्रकाराबाबत तक्रार दिली